निसर्ग आणि मानवी जीवनाचे भावबंध
मंदार घैसास यांच्या छायाचित्रांचे ‘इनर एक्स्प्रेशन’ हे प्रदर्शन जहांगीर टेरेस कलादालनात बुधवार १२ ओक्टोबरपासून सुरू सुरु झाले असून ते मंगळवार १८ ओक्टोबरपर्यंत सर्व रसिकांसाठी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळात खुले राहील.

कोहम हा आपल्या सर्वानाच पडलेला प्रश्न… कलाकाराने या विषयालाही आपल्या कलेत समाविष्ट केले आहे. नाथ , माऊली, पो आनंदो अशा प्रकारची छायाचित्रे आपल्याला दिव्य आध्यात्मिकतेकडे घेऊन जातात. त्यातील गहिरेपन मनाला स्पर्शुन जाते.तसेच मंदार घैसास यांना जाणवलेले निसर्गातील विविध विभ्रम ते लुमिनस अशा नावाने आपल्यासमोर सादर करतात. जे दिसते ते व्यक्त करताना अव्यक्ता पर्यंत पोहोचन्याचा त्यांचा आविष्कार उल्लेखनीय आहे.

