मुंबई फिल्म कंपनी आणि स्टारप्रवाहचा म्युझिक व्हिडिओ
रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुखने मुंबई फिल्म कंपनीच्या माध्यमातून स्टार प्रवाहच्या सहकार्यानं ‘थँक गॉड बाप्पा’ या अनोख्या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. हा व्हिडिओ अभिनेता रितेश देशमुखवर चित्रीत करण्यात आला असून, विशेष म्हणजे रितेशनंच हे गाणं गायलं आहे.

मनोज लोबो यांनी छायाचित्रण, अदेले परेरिया यांनी संकलन, मंदार नागावकर यांनी कलादिग्दर्शन, पुनीत जैन व अम्रिता सरकार यांनी वेशभूषा, नितीन इंदुलकर यांनी रंगभूषा केली आहे.
गीतकार आणि दिग्दर्शक कपिल सावंत यांच्या कवितेचे गाणे ते म्युझिक व्हिडियो या प्रवासात रितेश देशमुख यांचा सहभाग हाटर्निंगपॉईंट होता. रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची मुंबई फिल्म कंपनी आणि स्टार प्रवाह यांनी मिळून हा म्युझिक व्हिडिओ प्रत्यक्षात आणला. मनोरंजन वाहिनी म्हणून काम करताना ‘स्टारप्रवाह’ने कायमच सामाजिक भान जपलंआहे. मालिका आणि मनोरंजनाचे कार्यक्रम करताना समाजाला दिशा देणं हे ‘स्टारप्रवाह’ आपलं कर्तव्य मानते. त्याच विचारातून हे गाणं करण्यात आलं आहे.
आता स्टार प्रवाह वाहिनी हॉट स्टार तसेच सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून हे गाणं रसिकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. http://www.hotstar.com/thank-god-bappa/1000151043 आणि https://www.youtube.com/watch?v=4A7y-mMAA60 या लिंकवर ही गाणी उपलब्ध आहेत.