१०० कलाकारांच्या कलाकृतींचे कुलाब्यात प्रदर्शन सुरु
कॅन्सर पेशंट्स एंड असोशिएशन (सीपीएए)चे अकरावे वार्षिक कला प्रदर्शन ‘कलर्स ऑफ लाईफ’चे ५ जूनपासून सुरु झाले असून ते २० जूनपर्यंत सुरु राहणार आहे. सकाळी ११ ते रात्री ७ या वेळेत मुंबईत कुलाबा कॉजवे, बाटा शोरूमच्यावर, वोल्टन रोड, चौथा मजला, एलीसीयम मॅन्शन येथील द वीव्हिंग रूम येथे हे प्रदर्शन सुरु आहे.
गरजू कर्करोग रुग्णांसाठी निधी संकलन करण्याच्या उदात्त हेतूने आयोजित करण्यात येत असलेल्या या प्रदर्शनात शेकडो प्रख्यात भारतीय कलाकार सहभागी झाले आहेत. अरझान खंबाटा, बाबू झेवियर, बद्री नारायण, बुवा शेटे, चरण शर्मा, गुरचरण सिंग, जयदीप मेहरोत्रा, के एच आरा, ललीता लाजमी, नयना कनोडिया, नीलाद्री पॉल, समीर मोंडाल, संजय भट्टाचार्य, सनातन दिंडा, शुवाप्रसन्ना, सुब्रत गंगोपाध्याय, सुहास रॉय, सुनील दास, टी वैकुंटम, वृन्दावन सोलंकी आदी कलाकारांचा त्यात समावेश आहे.
यंदाच्या कलेक्शनमध्ये देशाच्या कानाकोप-यातील कलाकृतींचा समावेश आहे. ‘कलर्स ऑफ लाईफ’मध्ये रसिकांना सर्व प्रकारच्या कलाकृती पाहता येतात. वैविध्यपूर्ण माध्यमे आणि शैलींचे उपयोजित प्रकार या प्रदर्शनामध्ये हाताळलेले आहेत. यातील काही कलाकारांच्या कलाकृती मुंबईत आत्तापर्यंत अगदी अभावानेच प्रदर्शित झाल्या आहेत.
‘कलर्स ऑफ लाईफ’च्या व्यवस्थापिका आणि सीपीएएच्या विशेष प्रकल्प संचालिका पियाली शाम या निमित्ताने म्हणाल्या, “गेली दहा वर्षे ‘कलर्स ऑफ लाईफ’ या सीपीएएच्या वार्षिक प्रदर्शनाच्या आयोजनाचा अनुभव आगळाच आहे. मी एका कलासक्त कुटुंबातून आले आहे. माझे आजोबा रामेंद्रनाथ चक्रवर्ती हे एक प्रख्यात बंगाली स्कूल कलाकार होते. मी स्वतः कोलकाता येथील गव्हर्मेंट कॉलेज ऑफ आर्ट अंड क्राफ्टमधून पदवी घेतली आहे. त्याचमुळे माझे संपूर्ण आयुष्य हे भारतीय कला जगताशी अगदी जवळून जोडले गेले आहे. मी कित्येक कलाकारांना अगदी जवळून ओळखते. पण मला सर्वाधिक समाधान या प्रदर्शनाचे व्यवस्थापन करून मिळते. देशभरातील अनेक नामवंत कलाकारांशी संवाद साधण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळते. त्यात मग आघाडीच्या कलाकारांपासून ते अगदी युवा कलाकार आणि होतकरुंचाही समावेश असतो. त्यांच्या वैविध्यपूर्ण कलाकृती एकत्र करून त्यांचे प्रदर्शन भरविणे हे अत्यंत समाधानाचे असते. कलारसिकांनाही ते भावते. मला पूर्ण अशा आहे कि सीपीएए या प्रदर्शनाच्या माध्यमातून कर्करोगग्रस्त मुलांच्या उपचारांसाठी एक चांगला निधी उभा करण्यात यशस्वी होईल. माझी खात्री आहे कि या प्रदर्शनात जे कोणी सहभागी झाले आहेत त्यांच्यासाठी हा एक प्रगल्भ असा अनुभव राहिला असेल. २००५ पासून आम्ही हे आयोजन करत आहोत. सीपीएएच्या बांधिलकीला अनुसरून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबाला या दुर्दैवी रोगाशी सामना करण्यास मदत करण्यासाठी हे आयोजन केले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये या आयोजनाला मिळणारा प्रतिसाद हा उत्साहवर्धक आहे आणि त्यामुळे ते मुंबईतील एक सर्वात मोठे धर्मादाय आयोजन ठरले आहे.”
पियाली पुढे म्हणतात, “कलर्स ऑफ लाईफ’ आपल्या नावाप्रमाणेच वैविध्यपूर्ण रंगांची एक प्लेट असून समाजाच्या विविध विभांगातून प्रत्येकजण एकत्र येत हे प्रदर्शन परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. भारतभरतील कलाकारांप्रती आम्ही ऋणी आहोत, कारण ते वर्षानुवर्षे एकत्र येत असून या सामाजिक कारणासाठी आपले योगदान देत आहेत. आमचे ग्राहकही अगदी एकनिष्ठ राहिलेले आहेत. ते दरवर्षी येतात आणि सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून आपला हातभार लावतात व या कलाकृती आपल्या घरी घेऊन जातात. ओगील्वी अँड मॅदरने या प्रदर्शनाचा कॅटलॉग तयार केला असून त्या माध्यमातून आम्हाला माध्यम प्रसार मोहीम आखणे शक्य झाले. कमर्शियल आर्ट एन्ग्रेव्हर्स अँड प्रोडॉन एन्टरप्राईजने आम्हाला कलाकृतींचे फोटोग्राफ घेणे आणि त्यांचा कॅटलॉग प्रकाशित करणे याकामी मदत केली आहे. त्याशिवाय महत्वाचे म्हणजे विव्हिंग रूमने आम्हाला आमच्या या कलाकृतींच्या प्रदर्शनासाठी त्यांची गॅलरी उपलब्ध करून दिली आहे. शिवाय आम्हाला जिंजर पीआरने मोलाचे सहकार्य केले आहे. अनेक संस्था आणि व्यक्तींनीही या आयोजनाच्या यशासाठी मोलाचे असे सहकार्य आम्हाला दिले आहे. या सर्वांना एकत्रित बांधून ठेवणारा एक समान धागा आहे तो सामाजिक बांधिलकीच्या हेतूने होणा-या या आयोजनाचा. कर्करोगाचे प्रमाण आज वाढत आहे आणि त्यामुळेच त्याविषयीची जागरुकता आज घराघरात पोहोचली आहे.”
सीपीएएच्या या वार्षिक प्रदर्शनातील काही ग्राहक उदारहस्ते मदत करतात. शिवाय हे कलेक्शन एवढे विस्तृत आहे के प्रत्येकालाच येथे त्याच्या आवडीचे काहीना काही मिळते. त्याशिवाय येथील कलाकृती अगदी किफायतशीर आहेत. कलासक्त रसिकांना त्यांच्या कलेक्शनमध्ये मोलाची भर घालण्याची आणि आपले कलेक्शन अधिक प्रगल्भ बनविण्याची संधी त्यातून मिळते. याआधीच्या प्रदर्शनंप्रमाणेच हे प्रदर्शनही रसिकांना आपल्या पोर्टफ़ोलिओमध्ये मौल्यवन भर घालण्याची एक अनोखी संधी प्राप्त करून देईल.
प्रख्यात कलाकार समीर मोंडाल म्हणाले, “कलर्स ऑफ लाईफ’ या वार्षिक प्रदर्शनाची मी आतुरतेने वाट पाहत आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून या रोगाविषयी अगदी कमी ज्ञान असलेल्या आणि अगदी तुटपुंजी साधने उपलब्ध असलेल्या अशा वंचीत कर्करोग रुग्णांवर उपचार करणे शक्य होते. सीपीएए या रुग्णासाठी चाचणी, तपासणी आणि पुनर्वसन या इतरही उपक्रमांचे आयोजन करत आली आहे. कॅन्सर पेशंट्स एड असोशिएशन ही एक अगदी जुनी आणि सर्वात मोठी अशी कर्करोगच्या क्षेत्रात काम करणारी सेवाभावी संस्था आहे. संस्थेचे समर्पित कर्मचारी हे गरजू कर्करोग रुग्णांवर अगदी प्रेमाने उपचार करतात.”
ज्येष्ठ कलाकार चरण शर्मा म्हणाले, “कोणत्याही चांगल्या कामासाठी आपले योगदान देणे हे नेहमीच समाधान देणारे असते. गेली कित्येक वर्षे मला समाजाने भरभरून दिले आहे आणि आता समाजाप्रती जे शक्य असेल ते करण्याची ही माझ्यासाठीची वेळ आहे. गेली कित्येक वर्षे मी सीपीएएशी संबधित आहे आणि संस्था कर्करोगाशी सामना करण्यासाठी जे काम करत आहे त्याला पूर्ण पाठबळ देत आहे.”
संस्थेचे अध्यक्ष वाय के सप्रू म्हणतात, “कलर्स ऑफ लाईफ’ हे सीपीएएचा एक सर्वात मोठे आणि प्रतिष्ठेचे आयोजन आहे. या वार्षिक आयोजनाच्या माध्यमातून सीपीएएला एक मोठा निधी जमा करणे शक्य होते. हा निधी वंचित रुग्णांच्या सेवेसाठी आणि उपचारांसाठी वापरला जातो. आमच्या या सेवाभावी आयोजनामध्ये दरवर्षी सहभागी होऊन हातभार लावणा-या सर्व कलाकारांचे आम्ही शतशः आभारी आहोत. आमच्या संस्थेला या कलाकारांकडून असाच प्रतिसाद लाभावा हीच आमची अपेक्षा आहे.”
कला प्रदर्शन : ‘कलर्स ऑफ लाईफ’ १०० प्रख्यात भारतीय कलाकार त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन या आयोजनात कर्करोग रुग्णांसाठी निधी जमा करण्याच्या उद्देश्याने करतात.
स्थळ : विव्हिंग रूम, एलीसियम मॅन्शन, चौथा मजला, वोल्टन रोड, बाटा शोरूमच्या वर, कुलाबा कॉजवे, मुंबई.
कालावधी : ५ ते २० जून २०१५ वेळ : सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत.