कलागौरव पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना प्रदान!
नाट्य-सिने कलावंतांच्या उपस्थितीत रंगला संस्कृती कलादर्पण गौरव सोहळा!
संस्कृती कलादर्पण गौरव सोहळ्यात नाटक, चित्रपट आणि मालिका अशा एकूण तीन विभागात वेगवेगळ्या कलावंतांचा सन्मान करण्यात आला. त्यात जेष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना कलागौरव पुरस्कार देऊन सन्मानित केल्यानंतर उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा मानाचा मुजरा केला. नाटक विभागात ‘गोष्ट तशी गमतीची’, चित्रपट विभागात ‘एक हजाराची नोट’ आणि मालिका विभागात ‘कमला’ या मालिकेने अधिकाअधिक पुरस्कारावर आपले नाव कोरून सर्वोत्कृष्ट पुरस्कारांचाही मान मिळवला.
कलागौरव सन्मान स्वीकारल्यानंतर आशा काळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, ‘मी आजवर जे काही बरं केलं त्याला प्रोत्साहन दिलं, तुम्ही माय-बाप रसिकांनी कौतुक केलं आणि माझा आत्मविश्वास वाढवला. मी खरंच तुम्हा सर्वांची खूप ऋणी आहे. काहीही कळत नसताना कला क्षेत्रात आल्यावर मिळालेला सगळ्यांचा पाठिंबा खूप आधार देणारा होता. आजवर अनेक पुरस्कार मिळाले पण संस्कृती कलादर्पण कलागौरव पुरस्कार २०१५ घेताना विशेष आनंद होतोय. याच वर्षी माझ्या मराठी चित्रपट कारकिर्दीला ५० वर्ष पूर्ण झाली. जेव्हा एखाद्या कालाकाराला पुरस्कार मिळतो तो त्याच्या एकट्याचा कधीच नसतो. त्याच्यामागे अनेकांचे आशीर्वाद, सहकार्य आणि प्रेम असते. माझ्या बाबतीतही तसच आहे. माझी आई, भाऊ अनिल काळे आणि पती कै.माधव पांडुरंग नाईक याच्या लाभलेल्या साथीने मी एक संपन्न कलाकर होऊ शकले,’ आशी प्रांजळ कबुली आशा काळे यांनी दिली.
संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१५ या चित्र-नाट्य पुरस्कार सोहळ्यात संस्कृती कलादर्पण संस्थेच्या अध्यक्ष अर्चना नेवरेकर आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांच्या हस्ते संस्कृती कलादर्पण कलागौरव हा पुरस्कार ज्येष्ठ कलावंत आशा काळे यांना प्रदान करण्यात आला. मोठ्या धडाक्यात संपन्न झालेल्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत तंत्रज्ञ, कलावत मंडळी उपस्थित होती. गणपती, दुर्गेचे स्मरण करून श्री गणेशा झालेल्या सोहळ्याची रंगत अधिकच वाढत गेली. पुष्कर श्रोत्री आणि क्रांती रेडकर यांच्या खुसखुशीत निवेदनाने कार्यक्रमात बहार आणली.
या गौरव रजनीच्या पंधरा वर्षांच्या प्रवासाबद्दल सांगताना चंद्रशेखर सांडवे म्हणाले, ‘गेल्या पंधरा वर्षात मराठी चित्रपटाने चाकोरीबाहेर पाऊल टाकले आहे. त्यात खूप बदल झाले आहे आणि त्याच अनुषंगाने संस्कृतीनेसुद्धा कात टाकलीय. या चित्रपटसृष्टीतील अनेक वेगवेगळ्या तंत्रज्ञ, कलावंतांचा सत्कार करून त्यांचा योग्य तो सन्मान देण्याचा संस्कृतीचा प्रयत्न आहे. आज संस्कृती १६ व्या वर्षात पदार्पण करत आहे. याचा खूपच आनद होत आहे.”
नाटक, चित्रपट आणि मालिका अशा एकूण तीन विभागात पुरस्कार देण्यात आले. त्यातील नाटक विभागात ‘गोष्ट तशी गमतीची’, चित्रपट विभागात ‘एक हजाराची नोट’ आणि मालिका विभागात ‘कमला’ या मालिकेने अधिकाअधिक पुरस्कारावर आपले नाव कोरले.
पुरस्कार वितरणाबरोबरच कलावंतांच्या धमाल परफॉर्मन्समुळे सोहळ्याला चार चांद लागले. संस्कृती बालगुडेच्या कार्निव्हल डान्सवर सारेच थिरकले तर मानसी नाईक आणि आरती सोळंकी यांच्या परफॉर्मनसला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. कमलाकर सातपुते, सुप्रिया पठारे, आणि अंशुमन विचारे यांनी सोळाव्या वर्षात पदार्पण करणा-या किशोर वयीन मुलाच्या मानसिकतेचा वेध घेणारे प्रहसन प्रेक्षकांनी मनापासून अनुभवले. हलक्या पुलक्या विनोदांनी उडणारी हास्याची कारंजी उल्लेखनीय होती.
या सोहळ्यातील पुरस्कार खालीलप्रमाणे
नाट्य विभाग
१) सर्वोत्कृष्ट नेपथ्य- नितीन नेरुरकर (त्या तिघांची गोष्ट)
२) सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना – भूषण देसाई (श्री शिवसमर्थ )
३) सर्वोत्कृष्ट संगीत – देवदत्त साबळे (परंपरा डॉट कॉम)
४) सर्वोत्कृष्ट लेखक – मिहिर राजदा (गोष्ट तशी गमतीची)
५) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सुप्रिया पठारे (मदर्स डे)
६) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- सुर्यकांत देवळे (काळात नकळत)
७) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – लीना भागवत (गोष्ट तशी गमतीची)
८) सर्वोत्कृष्ट अभिनेता- मंगेश कदम (गोष्ट तशी गमतीची)
९) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- अद्वैत दादरकर (गोष्ट तशी गमतीची)
१०) सर्वोत्कृष्ट नाटक – गोष्ट तशी गमतीची (सोनल प्रोदाक्षंस आणि नाट्य सुमन)
लक्षवेधी अभिनेत्री घोषित- ज्ञानदा पानसे (त्या तिघांची गोष्ट )
लक्षवेधी अभिनेता घोषित- शशांक केतकर (गोष्ट तशी गमतीची )
चित्रपट विभाग
१) सर्वोत्कृष्ट रंगभूषा- लोकमान्य-एक युगपुरुष
२) सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक – संतोष फुटणे (लोकमान्य- एक युगपुरुष)
३) सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- संतोष मुळेकर (विटी दांडू)
४) सर्वोत्कृष्ट गीतरचना- गुरु ठाकूर (लय भारी)
५) सर्वोत्कृष्ट संगीत – अमितराज (क्लासमेट्स)
६) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – बेला शेंडे (क्लासमेट्स)
७) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अजय गोगावले (लय भारी)
८) सर्वोत्कृष्ट छायांकन – प्रसाद भेंडे (लोकमान्य एक युगपुरुष)
९) सर्वोत्कृष्ट संकलन – फैजल -इमरान (क्लासमेट्स)
१०) सर्वोत्कृष्ट संवाद- समीर विद्वांस
११) सर्वोत्कृष्ट पटकथा- श्रीकांत बोजेवार
१२) सर्वोत्कृष्ट कथा – मधुगंधा कुलकर्णी (एलिझाबेथ एकादशी)
१३) सर्वोत्कृष्ट बालकलाकार – निशांत भावसार (विटी दांडू)
१४) सर्वोत्कृष्ट खलनायक- शरद केळकर(लय भारी)
१५) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- स्मित तांबे (कॅण्डल मार्च )
१६) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – निलेश दिवेकर (कॅण्डल मार्च )
१७) सर्वोrत्कृष्ट अभिनेत्री – सई ताम्हणकर (गुरुपोर्णिमा)
१८) सर्वोत्कृष्ट अभिनेता – सुबोध भावे (लोकमान्य ) आणि सचिन खेडेकर (शटर)
लक्षवेधी अभिनेता घोषित- रितेश देशमुख (लय भारी)
१९) दिग्दर्शक- श्रीहरी साठे (एक हजाराची नोट )
प्रथम पदार्पण दिग्दर्शन- क्रांती रेडकर (काकण)
सर्वोत्कृष्ट चित्रपट- एक हजाराची नोट (इन्फीनिटम प्रोडक्शन प्रा. लि.)
लक्षवेधी चित्रपट- काकण (मगोरेंज प्रोडक्शन)
२०) सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट – धनगरवाडा(राम लक्ष्मण चित्र )
विशेष ज्युरी – उर्मिला कानिटकर
लक्षवेधी चित्रपट घोषित- लय भारी (सिनेमंत्र एनटरटेनमेंट)
टीव्ही मालिका विभाग
विशेष लक्षवेधी मालिका – जयोस्तुते -कोठारे व्हिजन प्रा. लि. स्टार प्रवाह
विशेष लक्षवेधी अभिनेत्री घोषित – पल्लवी पाटील
सर्वोत्कृष्ट पदार्पण- अशीविनी कसर (कमला)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – किशोरी अंबिये (देवयानी-स्टार प्रवाह )
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सुशांत शेलार – (असावा सुंदर स्वप्नांचा बंगला- कलर्स मराठी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- दीप्ती केतकर (कमला – कलर्स मराठी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- हरीश दुधाडे (माझे मन तुझे झाले- कलर्स मराठी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अजय मयेकर (कमला- कलर्स मराठी)
सर्वोत्कृष्ट मालिका – कमला- दशमी क्रिएशन- कलर्स मराठी
न्यूज चॅनेल विभाग
सर्वोत्कृष्ट सूत्रधार पुरुष घोषित- अमित भंडारी – एबीपी माझा
सर्वोत्कृष्ट सूत्रधार स्त्री घोषित- वैदेही विशाल काणेकर- मी मराठी
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम घोषित- प्रशांत अनासपुरे- झी २४ तास
सर्वोत्कृष्ट न्यूज चॅनेल- ए बी पी माझा
उल्लेखनीय पत्रकारिता पुरस्कार घोषित- दिलीप ठाकूर