‘स्पंदन’ फेस्टिवलमध्ये ‘ब्रेव्हहार्ट्स २०१७’
बॉम्बे व्हेटर्नरी कॉलेजने ‘स्पंदन २०१७’ या वार्षिक फेस्टिवलमध्ये ‘ब्रेव्हहार्ट्स २०१७’ असा एक उपक्रम राबवला. या उपक्रमात सर्व्हिस डॉग्सना पुरस्कृत करण्यात आलं. जवळजवळ १८ विविध डिपार्टमेंट्स मधील ३० डॉग्स ज्यांनी या सर्व डिपार्टमेंट्समध्ये अभिमानास्पद कामगिरी केली, त्या सर्वांचं कौतुक सई ताम्हणकरने!
नॅशनल पेट डे निमित्त सई तिच्या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याबद्दल आपला अनुभव सांगताना म्हणते, “मी अनुभवलेल्या पुरस्कार सोहळ्यांपैकी हा पुरस्कार सोहळा सर्वात अनोखा होता हे म्हणणं अगदी योग्य ठरेल. ती जागा ज्यांनी आपल्या समाजासाठी आणि देशासाठी अतोनात काम केलं अशा सर्व क्युट डॉग्सनी व्यापलेली होती. मी तिकडे सॅम, डॉन, रेक्स, बिंगो या सर्व्हिस डॉग्सना भेटली. मला त्यांना भेटून खूप छान वाटलं. त्याचसोबत मला सिलेब्रिटीज व्हेटर्नरी हॉस्पिटलला देणगी देऊन मदत करू शकतात हे कळलं. १० वर्षांपूर्वी मी माझ्या पेट टर्टलसाठी व्हेटर्नरी हॉस्पिटलला व्हिजीट केल्याचं मला आठवतंय. बॉम्बे व्हेटर्नरी कॉलेजला माझ्या खूप खूप शुभेच्छा”