आर. रश्मी यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सुरु
प्रसिद्ध चित्रकार आर. रश्मी यानी अलिकडच्या काळात साकर केलेल्या चित्रांचं ‘सॉँग्स फ्रॉम द गोल्डन सॅन्डस‘ हे चित्रप्रदर्शन कमलनयन बजाज आर्ट गॅलरी, बजाज भवन, जमनालाल बजाज मार्ग, २२६ नरिमन पॉईंट, मुंबई १९ सप्टेंबरपासून सुरु झाले असून ते २४ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.

राजस्थानच्या रमणीय भूप्रदेशाने चित्रकर्तीला वेड लावलं. त्या सोनेरी वाळूने, क्षितीजापर्यंत अथांग पसरलेल्या वाळवंटाच्या भव्यतेने आणि तिथल्या जनमानसाने या चित्रकर्तीला अनोख्या ढंगातील चित्रं चित्रीत करायला प्रवृत्त केलं. माणसांचे चेहरे, त्यांची दिनचर्या, मुला-माणसांची पारंपारीक वेशभूषा हा चित्रांचा विषय झाला.
छाया-प्रकाशाचा कॅनव्हासवरील खेळ, विविध माध्यमं, रंग आणि तंत्र यांचा सुरेख संगम या चित्रप्रदर्शनात पहायला मिळेल. संगीत, ताल आणि लय यांचा मेळ अनेक चित्रांमध्ये घातला गेला आहे. ग्रामिण भारताचं देखणं चित्रण या मालिकेत अनुभवता येणार आहे.