पडद्यामागचा कलाकार सुभाष शिंदे
सध्या ‘सरबजीत’ चित्रपटाची जितकी चर्चा सुरु आहेत तितकीच जोरदार चर्चा चित्रपटातील मुख्य कलाकार ऐश्वर्या रायबच्चन आणि रिचा चड्डा यांच्या लुकची होतेय. चित्रपटबनवण्यापूर्वी दिग्दर्शक ओमंग कुमार यांच्या कल्पनेतील व्यक्तिरेखा अगदी कुशलपणे प्रत्यक्षात उतरवणारा पडद्यामागचा कलाकार म्हणजे मेकअप आर्टिस्ट सुभाष शिंदे.
सुभाष शिंदे यांनी ‘सरबजीत’मध्ये ऐश्वर्या राय बच्चनचे २५ ते ५२ वर्षापर्यंतचे लूक अगदी नैसर्गिक आणि परिपूर्ण दाखवण्याची काळजी घेतली आहे. खुद्द ऐश्वर्या राय बच्चनने देखील प्रेस कॉनफ़रन्समध्ये सुभाषचे तोंडभरून कौतुक केले.ऐश्वर्याचा मेकअप करण्यसाठी सुभाष यांनी प्रोस्थेटिक मेकअपचा वापर केलेला नाही.
‘रामलीला’, ‘मेरी कॉम’, ‘ब्लॅक’, ‘शिरीन फराद कि निकल पडी’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधील अभिनेत्रींच्या लूकमागे मेकअप आर्टिस्ट सुभाष शिंदे यांचा हात आहे.
लहानपणापासूनच चित्रकला आणि व्यंगचित्र यांची विशेष आवड असलेल्या सुभाष शिंदे यांना खरच जादुगारम्हणाव लागेल. मेकअपची कला शिकण्यासाठी ते कुठल्याही शाळेत किंवा संस्थेत गेले नाही. २० वर्षांचा दांडगा अनुभव असलेल्या सुभाषने मराठी चित्रपटसृष्टीतही कार्यरत होण्यासाठी अथक प्रयत्न केले पण त्यांना संधी मिळाली ती दीपक राणे यांच्या‘७२ मैल एक प्रवास‘ या सिनेमातआणि त्यानंतर दिग्दर्शक संजय जाधव यांच्या प्रत्येक चित्रपटासाठी सुभाष यांनी काम केले आहे.