साहित्य संमेलन, आगरी युथ फोरम आणि काव्यरसिकचे आयोजन
९०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, आगरी युथ फोरम आणि काव्यरसिक मंडळाच्या वतीने डोंबिवलीत ११ जून रोजी एकदिवसीय गझल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत होणाऱ्या या कार्यशाळेत महाराष्ट्रातील मान्यवर साहित्यिक मार्गदर्शन करणार आहेत.
टिळकनगर विद्यामंदिर, नवी इमारत,टिळकनगर, डोंबिवली पूर्व येथे ही कार्यशाळा होईल. सकाळी ९ वाजता उद्घाटन झाल्यानंतर पहिल्या सत्रात सकाळी ९ ते ११.३० दरम्यान पुण्याचे बेफिकीर ‘मराठी गझलचे तंत्र आणि मंत्र’ सांगतील. दुसरे सत्र सकाळी ११.४५ ते दुपारी १ या दरम्यान होणार असून, त्यात ‘उर्दू आणि मराठी गझल’ या विषयावर डोंबिवलीचे संदीप गुप्ते मार्गदर्शन करतील. दुपारी २.१५ ते ४ या वेळेत ‘मराठी गझल : शंका निरसन’ या विषयावर मुंबईचे सदानंद डबीर शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन करतील. दुपारी ४.१५ ते ५.१५ या सत्रात ‘मराठी कविता आणि गझल’ या विषयावर ठाण्याचे अशोक बागवे मार्गदर्शन करतील. सायंकाळी ५.३० ए ६ दरम्यान गझलगायन प्रात्यक्षिक झाल्यानंतर सायंकाळी ६.३० ते रात्री ८.३० या वेळेत गझल मुशायरा होणार आहे.
या कार्यशाळेसाठी प्रत्येकी ३०० सहभाग शुल्क आकारले जाणार असून, त्यात चहा, नास्ता,दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा यांसह गझलची एक पुस्तिका सहभागींना दिली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी ९३२०२०३२१२, ९५९४९११४९२, ९८२१८०४१३६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.