सोनाली खरे, मुक्ता बर्वे, सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका
फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस ‘हृदयांतर’व्दारे लेखक-दिग्दर्शक-निर्माता म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहेत. त्यांच्या भावनात्मक नाट्य असलेल्या ‘हृदयांतर’चे पोस्टर बुधवारी रिलीज झाले.
टॅब एन्टरटेन्मेटची प्रस्तुती असलेल्या विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि यंग बेरी एन्टरटेन्मेट (प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा पुर्वेश सरनाईक) निर्मित, आणि विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटामध्ये सोनाली खरे, मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट ७ जुलैला चित्रपटगृहात झळकणार आहे.
याविषयी निर्माता-दिग्दर्शक विक्रम फडणीस म्हणतो, ‘ही फिल्म मोठ्यांनीच नाही तर लहान मुलांनीही पाहावी, असं आम्हांला वाटतं. ही कौटुंबिक भावनात्मक फिल्म आहे. त्यामुळे प्रत्येक आई-वडिलांनी त्यांच्या मुलांसह ही फिल्म पाहावी, असं आम्हांला वाटतं. त्यामुळे आम्ही सर्वानुमते हृदयांतर ७ जुलैला रिलीज करायचा निर्णय घेतलाय.’
चित्रपटामध्ये सुपरस्टार हृतिक रोशन आणि टेलिविजन होस्ट मनिष पॉलच्याही भूमिका आहेत.