अतिरिक्त कस्टम आयुक्त राजेश ढाबरे यांची मदत
मोहम्मद रफी यांच्या ३५ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ‘रूह ए रफी’ या शीर्षकांतर्गत गायक मोहम्मद रफीच्या अजरामर गीतांचा संगीतमय कार्यक्रम नुकताच झाला. या कार्यक्रमात जमा झालेला निधी प्रशीक एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशनच्या गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी खर्च करण्यात आला.
गेली अनेक वर्षे सांस्कृतिक, शैक्षणिक, आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या बीआरडी फिल्म्स प्रॉडक्शनच्या वतीने “रूह ए रफी” या शीर्षकांतर्गत गायक मोहम्मद रफीच्या अजरामर गीतांचा संगीतमय कार्यक्रम माटुंगा येथील म्हैसुर असोसिएशन हॉलमध्ये आयोजित केला होता. याप्रसंगी अतिरिक्त कस्टम आयुक्त राजेश ढाबरे, बीआरडी फिल्म्स प्रॉडक्शनच्या संचालिका डॉ. भावना राज, प्रशीक एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशनचे आनंद साळवी उपस्थित होते. गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी अतिरिक्त कस्टम आयुक्त राजेश ढाबरे यांनी या कार्यक्रमाची निर्मिती, दिग्दर्शन, संगीत संयोजन आणि गायन केले होते.