डान्स पोझेसमध्ये आग, पाणी, हवा, आकाश, धरती
मराठी मनोरंजन क्षेत्रात डान्स आणि अभिनयात स्वतःचा वेगळा ठसा उमटवू पाहणाऱ्या रिचा अग्निहोत्रीनं फोटो शूटसाठी पंचततत्वाची थीम वापरली असून, डान्सच्या पोझेसमध्ये आग, पाणी, हवा, आकाश आणि धरती या पाचही तत्वांची आखणी केली. त्यांचा वापर करत ती पारंगत असलेल्या डान्स ऍक्शन्स तिनं या फोटोशूट साठी वापरल्या आहेत.
‘ढोलकीच्या तालावर’नंतर रिचा अग्निहोत्री सध्या साऊथ मधला ‘किक’ हा डान्स रिअँलिटी शो गाजवत आहे.
आगीचा वापर करताना तलवारीचा उपयोग करून योद्ध्याच्या लूक मध्ये ती समोर आली आहे तर त्याच तलवारीचा वापर करून तिनं फोटोमध्ये ग्लॅमरही आणलं आहे. गिटार,पाणी आणि हाय डान्सीकल जम्प घेतली आहे. हिप हॉप आणि बी-बोईंग हे डान्सफार्म मुलींपेक्षा मुलांमध्ये जास्त पॉप्युलर आहेत; पण आपण त्यातही मागे नाही हे रिचानं तिच्या डान्स शोज मधून दाखवून दिलंच आहे. या फोटोशूटसाठीही तिनं या डान्स फॉर्ममधल्या अवघड पोश्चर्सचा वापर केला आहे.
कथ्थक या नृत्यशैलीत पारंगत असलेल्या रिचानं ‘ढोलकीच्या तालावर’मध्ये लावणी नृत्य करून धम्माल उडवून दिली होती आणि ती या रिअँलिटी शोमध्ये टॉप फाईव्हपर्यंत पोहचली होती. लावणीसोबत कथ्थक आणि झामासारख्या वेस्टर्न डान्स फॉर्मचं फ्युजन करून लावणीत आपला वेगळेणा सिद्ध केला होता. यानंतर तिची उदया टीव्हीवरील ‘किक’ या डान्स रिअँलिटी शोसाठी निवड झाली होती. सध्या ती हा शो गाजवत तिथेही टॉप एटपर्यंत पोहोचली आहे.
‘किक’ या डान्स शोमधेही तिने मॉडर्न कथ्थक करून परीक्षकांना आश्चर्यचकीत करून सोडलं, इतकंच नाही तर महाराष्ट्राची शान असलेली लावणी त्या रंगमंचावर दणक्यात परफॉर्म करून परिक्षकांची वाहवा मिळवली आणि लावणी कर्नाटकापर्यंत पोहचवली.
या फोटोशूटमधून वेगळीच ग्लॅमरर्स रिचा प्रेक्षकांच्या समोर येत आहे. या निमित्तानं रिचानं मराठीत थीम फोटो शूटचा नवा ट्रेंड सेट केला आहे. हे फोटोशूट नंदू धुरंधर यांनी केलं असून, कॉस्चुम स्टाईलींगची जबाबदारी अभिजित ठाकूर यांनी सांभाळली आहे.