भारतातील अग्रणी फॅशन ब्रँड असलेल्या मॅक्स फॅशनतर्फे स्प्रिंग २०१७ कलेक्शन सादर करण्यात आले. हे कलेक्शन वसंत ऋतूमधील खास आकर्षण ठरणार आहे.
इम्पिरिअल ब्ल्यूच्या तेजस्वी छटा आणि बार्बाडोस चेरी रेड हे रंग वसंत ऋतूत प्रामुख्याने दिसून येतात. हा ऋतू निवडक ट्रेंड दर्शवतो. त्यात रफल डिटेल्स, अनियमित हेम लाईन्स, इंजिनीअर्ड अॅप्लिक, नैसर्गिक छटा, इन्फ्लेटेड सिल्हाउट्स आणि ओव्हसाईझ्ड प्रपोर्शन्सचा समावेश असतो, जेणेकरून कपडे अभिरुची संपन्न आणि मोकळे-ढाकळे असतील. या संग्रहात प्रत्येक प्रसंगासाठी साजेशा असलेले वैविध्यपूर्ण एक्स्क्लुसिव्ह पोशाख, पादत्राणे आणि अॅक्सेसरींच्या माध्यमातून अभिजात दृष्टी आणि पॅशन दर्शविण्यात आली आहे.
महिला, पुरुषांच्या पोशाखासह लहान मुलांसाठीचे खास कलेक्शन मॅक्समध्ये आहे.
मॅक्स हा एक अग्रणी फॅशन ब्रँड आहे. ग्राहकांना त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी कपडे, अॅक्सेसरी आणि पादत्राणांच्या गरजा भागविणारा वन-स्टॉप-शॉप ब्रँड आहे. मॅक्स हा लँडमार्क ग्रुपचा फॅशन ब्रँड असून त्यांनी या देशात ‘लेटेस्ट फॅशन अॅट ग्रेट प्राइसेस’ ही संकल्पना रुजवली. या माध्यमातून आपल्या चोखंदळ ग्राहकांसाठी आंतरराष्ट्रीय फॅशन आणि दर्जाचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आली. जगभरातील १६ देश आणि भारतात मॅक्सची एकूण ३५० दुकाने आहेत. ६० देशांमध्ये मॅक्सची १६० हून अधिक दुकाने आहेत. आर्थिक वर्ष १६-१७च्या अखेरपर्यंत भारतात १९० दुकानांचे जाळे तयार करण्याची या ब्रँडची योजना आहे.