ग्राफिकल ड्रॉईंगचे १ सप्टेंबरपासून प्रदर्शन
जेव्हा एखादा कलाकार समाजातील आपल्या भावनाकलेच्या माध्यमातून व्यक्त करतो तेव्हा आपणास सर्वकाही स्पष्ट आणि समजण्यासारखे होते. अशोक नामदेव हिंगे हा असाच चित्रकार आहे जो आपल्या अवती-भवती घडणाऱ्या छोट्याछोट्या घटनांचे सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनाचे निरीक्षण करून आपल्या चित्रात अगदी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतात.
अशोक नामदेव हिंगे यांनी हे चित्रित करण्यासाठी एका आगळ्या-वेगळ्या आकाराचा वापरकेला आहे, त्यांनी इंग्रजीतील कॉमा (मराठीतील स्वल्प विराम) या विराम चिन्हांचा वापर करून आपल्या चित्रात अनेक विषय मांडले आहेत.
चित्रकाराने या चित्रमालिकेला ‘कॉमास्केपस’ असे नाव दिले आहे कारण कॉमा हे या चित्रमालिकेतील मोठे दमदार पात्र आहे, जे वेगवेगळे विषय घेऊन प्रत्येक चित्रात दिसते.
अशोक हिंगे यांनी कॉमा हा अतिशय कल्पकतेने जीवनातील वेगवेगळ्या घटना दर्शवण्यासाठी आपल्या चित्रात एकदम वेगळ्या पद्धतीने वापरला आहे. चित्रकाराने कॉमाचा वापर करून समाजातील घटना, धर्म, जीवनशैली, व्यवसाय, नाती, सामाजिक विषय व संदेश . दर्शवले आहे. म्हणूनच कॉमा हा जीवन आणि पूर्ण मानवी अस्तित्वाचे एक सर्वोच्च प्रतीक चित्रित केले आहे असे दिसते.
‘कॉमास्केपस’ या चित्रमालिकेतील प्रत्येक चित्र हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित असल्याचे दर्शन होते.
‘कॉमास्केपस’ हे प्रदर्शन डिनोडिया 1×1 आर्ट गॅलरी, नरिमन पॉईंट, मुंबई येथे १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत सर्वकलारसिकांसाठी खुली राहील.