‘हा मैं अलिबाग से आया..’ या गाण्याची पार्श्वभूमीबाबत गुलमोहर’च्या प्रोडक्शन हाऊसने सांगितले की, ‘समोरच्या व्यक्तीतील गुणांचा विचार न करता त्याची खिल्ली उडवत, त्याचं मनोधैर्य खच्ची करण्याचं सर्वांच्या तोंडी बसलेलं वाक्य म्हणजे ‘अलिबाग से आया क्या?’ इतिहास हाच की अलिबागची माणसे म्हणजे साधी, सरळ, कोणालाही न फसवणारी.. म्हणून ते टवाळखोरांच्या मते मूर्ख ठरले.. याच उपहासाला वैतागून अलिबागचा युवक बाहेरच्या जगात त्याचा आत्मविश्वास गमावू लागला… पण आता वेळ बदलली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आता अलिबागकर गर्वाने उत्तर देणार.. हा मैं अलिबाग से आया!’

चित्रपटगृहात ९ डिसेंबरपासून ‘गुलमोहर’ फुलणार
आत्मविश्वास जागवणाऱ्या ‘हा मैं अलिबाग से आया..’ची धूम
मृण्मयी देशपांडे आणि भूषण प्रधान यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘गुलमोहर’ ९ डिसेंबरपासून सिनेमागृहात फुलणार असून, ‘हा मैं अलिबाग से आया..’ हे या चित्रपटाचे प्रोमोशन सॉंग अलिबागकरांचा आत्मविश्वास जागवतो आहे.
अलिबागकर जगात कुठेच कमी नाहीत.. प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत.. हा वारसा चालत आलाय दर्यावर्दी सरखेल कान्होजी आंग्रेपासून स्वतंत्र भारताचा अभिमान जनरल अरुण कुमार वैद्य ते जयमल्हार मालिकेतील स्वतः खंडोबाची भूमिका करणारे देवदत्त नागे यांच्या पर्यंत… हाच सोनेरी वारसा ‘गुलमोहर’ हा मराठी चित्रपट पुढे चालवणार आहे…
हा चित्रपट स्वतः प्रसिद्ध लेखक/गीतकार/अभिनेते/निर्माते श्रीरंग गोडबोले यांनी पाहिला व अलिबागमधील टॅलेंट पाहून ते थक्क झाले.. त्यांनी अलिबागची धमक ओळखली आणि ठामपणे या चित्रपटाच्या मागे त्यांचा स्वतःचा सिनेमा असल्यासारखे उभे राहिले… ‘हा मैं अलिबाग से आया..’ या गीताचे गीतकार आहेत स्वतः श्रीरंग गोडबोले.
अलिबागच्या मातीचा अभिमान जागवणारे आणि मनामनात अलिबागचा गर्व द्विगुणित करणाऱ्या ‘हा मैं अलिबाग से आया’ या प्रोमोशनल गीतासह ‘गुलमोहोर’ ९ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.