जहांगीर कलादालनात ३१ मार्चपासून मीनाक्षी पाटील यांच्या चित्रांचे प्रदर्शन
महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील व त्यांच्या समूहातील इतर चित्र व शिल्पकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन ३१ मार्चपासून मुंबईतील जहांगीर कलादालनात भरवले जात आहे. ६ एप्रिलपर्यंत चालणा-या या प्रदशर्नाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, अखिल भारतीय स्त्रीशक्तीच्या सहसचिव वर्षा तावडे यांच्या शुभहस्ते ३१ मार्चला संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.
सदर चित्रप्रदर्शनात कॅनव्हासवर अक्रिलिक कृष्ण-धवल रंगातील बिंदूंचे वैविध्यापूर्ण विभ्रम त्यांनी चितारले असून, विस्तीर्ण अवकाश व मधूनच प्रकटणा-या दृश्य प्रतिमांचा मनोहारी खेळ मीनाक्षी पाटील यांनी चितारला आहे. सदर चित्रप्रदर्शन ६ एप्रिलपर्यंत जहांगीर कलादालनात पहायला मिळेल. या प्रदर्शनात मीनाक्षी पाटील यांच्याबरोबरच नीलकांती पाटेकर, मंगेश काळे, नीलाद्री मुजुमदार व सुब्रतो सहा यांचीदेखील चित्र-शिल्प कलादालनात पहायला मिळतील.
मीनाक्षी पाटील यांच्या कलाकृतीची आजपर्यंत सहा एकल व पाच समूह प्रदर्शने झालेली असून त्यांचा ‘ इज इट इन युवर डीएनए ’ हा कविता संग्रहसुद्धा प्रकाशित झालेला आहे. त्यांनी आजपर्यंत विविध विषयांवरील चीत्रामालीकांचे रंग्लेखन केले असून त्यांच्या सदर प्रदर्शनात ‘ तत् त्वं असि’ या शीर्षकाची चित्रमालिका मांडण्यात येणार आहे. मीनाक्षी पाटील यांच्या लेखनातून तसेचचित्रांमधून ‘आत्मशोध’ ही संकल्पना सातत्याने अभिव्यक्त झालेली असून त्यांच्या सजर्नाचा तोच मुख्य केंद्रबिंदू कायम राहिला आहे. त्यांच्या चित्रांची ‘स्व’चा शोध ही प्रमुख प्रेरणा असली तरी या ‘स्व’चा शोधविविध अंगानी घेतानाच व्यष्टी आणि समष्टीच्या आंतिरक नात्याचाही त्या सूक्ष्मपणे वेध घेताना दिसतात.
आजच्या व्यामिश्र जीवनशैलीत, जगण्याच्या कोलाहलात हरवलेल्या गर्दीत ‘कोहं’ म्हणून सुरू झालेला हा प्रवास ‘ तत् त्वं असि’पर्यंत पोहोचतांना एका संवेदनशील कलावंतांची होणारी घुमसट प्रभावीपणे सदर चित्रप्रदर्शनात पहायला मिळते. जन्माला आल्यापासून जगण्याच्या विविध टप्प्यांवर प्रवास करताना चिकटवली जाणारी लेबलं नाकारताना, ‘स्व’चा सर्वांगाने शोध घेताना त्या ‘स्व’कडे अलिप्तपणे, साक्षीभावाने, तटस्थपणे, त्रयस्थपणे पाहिल्याशिवाय ‘तत् त्वं असि’ असे ‘स्व’चे समग्र आकलन होऊच शकत नाही, या विचारधारेतून स्फुरलेली चित्रे मीनाक्षी पाटील यांनी सदर प्रदर्शनात मांडली आहेत.