२४जूनला चित्रपटगृहांत येतोय
कुस्तीच्या आखाड्यात ज्या पहलवानाचं आयुष्य गेलं अशा भगवान दादांच्या आयुष्यावर आधारीत सिनेमा आणि त्यात भगवान दादांची भूमिका साकारायची, हे आव्हान मंगेश देसाई यांनी स्वीकारलं आणि त्या वाटेवर येणाऱ्या प्रत्येक अडचणीला तोंड देतं हा अलबेला प्रवास केला.
डान्सिंग सुपरस्टार आणि स्टंटमॅन असणारे भगवान दादा स्वत: त्यांच्या चित्रपटातले स्टंट्स करायचे हे माहित असणाऱ्या मंगेश देसाई यांनी एक अलबेलाच्या निमित्ताने भगवान दादा स्वत:त उतरवले. २२ फूटांवरून उडी मारायची असो वा स्वॉर्ड फायटींगचे कसब दाखवणे, कोणत्याही बॉडी डबलशिवाय मंगेश देसाई यांनी स्वत: हे सगळे स्टंट्स केले आहेत.
या स्टंट्सविषयी बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर सरतांडेल म्हणाले,स्वॉर्ड फायटिंगच्या सरावादरम्यान डोळ्याला दुखापत होऊनही शूटींग लांबणीवर न टाकता मंगेशने ती पूर्ण केल्याचे दिग्दर्शकांनी अभिमानाने म्हटले.
याच आठवणींना उजाळा देत मंगेश देसाई यांनी, “माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी ऍक्शन सिक्वेन्सेस केल्याचे म्हणत, हे अजिबात सोपे नसल्याचे म्हटले आहे. मी करू शकेन की नाही अशी शंका मनात होती, पण प्रत्येक अभिनेत्याला आव्हान स्वीकारावेच लागते. तसेच हे आव्हान मी स्वीकारले आणि या चित्रपटात आलेला प्रत्येक ऍक्शन सिक्वेन्स मी स्वत: केल्याचे, मंगेश देसाई सांगतात.