‘स्टार प्रवाह’वर १० ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या ‘नकुशी’ या मालिकेने अल्पावधीतच टीव्ही रसिकांच्या मनात घर केले असून, या मालिकेत मोठ्या ‘नकुशी’ची भूमिका प्रसिद्धी किशोर आयलवार ही वैदर्भीय कलावंत साकारणार आहे.
२० ऑक्टोबरच्या भागापासून प्रसिद्धी ‘नकुशी’ची मुख्य भूमिका साकारणार असून सायंकाळी ७ वाजता ही मालिका स्टार प्रवाहवर प्रदर्शित आहे. रात्री १० वाजतासह दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता आणि सायंकाळी ५ वाजता या भागांचे पुनर्प्रक्षेपण होणार आहे.