चित्रपटाचा ट्रेलर केला सोशल मिडीयातून शेअर
‘बिग बी’ म्हणजेच अमिताभ बच्चन प्रत्येक कामातील परफेक्शनसाठी, डेडीकेशनसाठी सुप्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांनी एखाद्याच्या कामाची स्तुती करणं ही खूप मोठ्या सन्मानाची गोष्ट समजली जाते. नुकताच हा सन्मान पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित ‘उबुंटू’ या चित्रपटाला मिळाला.
Trailer Link : https://www.youtube.com/watch?v=atSfdmYrcUc&t=113s
“भारतीय चित्रपट सध्या उत्तमोत्तम कथानिर्मिती करत आहे. ‘उबुंटू’ या चित्रपटाचा ट्रेलरदेखील याच उत्तम कलाकृतींपैकी एक आहे” अशा आशयाच्या पोस्टसोबत त्यांनी ‘उबुंटू’ या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेअर केला. आता साक्षात बॉलीवूडचा शहेनशहा ‘उबुंटू’ या चित्रपटाचा ट्रेलर बघण्याचे आवाहन करत असेल तर मग तो बघायलाच हवा!
या चित्रपटाविषयी जबरदस्त उत्सुकता वाढण्याचं अजून एक कारण म्हणजे चित्रपटाचे गंमतीदार नाव! ‘उबुंटू’ म्हणजे नक्की काय? हा कोणत्या भाषेतील शब्द आहे? शिवाय ट्रेलर वरुन कथानका बद्द्ल वाढलेले कुतूहल, पुष्कर श्रोत्री यांचे कसदार लेखन आणि दिग्दर्शन आणि त्यातून निर्माण झालेल्या या अप्रतिम कलाकृतीनं खुद्द ‘बिग बी’ना भुरळ पाडली आहे आणि आता प्रेक्षकांना भुरळ पाडण्यासाठी ‘उबुंटू’ येत आहे येत्या १५ सप्टेंबर रोजी. तेंव्हाच या शंकांचं निरसन होईल. तोपर्यंत या ट्रेलरमध्ये काही उत्तरं मिळतायेत का बघूयात . https://twitter.com/SrBachchan/status/905120061345501184