१० जूनला सिनेमागृहांत होणार दाखल
इमेज एसआरके प्रोडक्शन्स ‘बरड’च्या निमित्ताने एक ज्वलंत विषय घेऊन येत असून, हा सिनेमा येत्या १० जूनपासून चित्रपटगृहांत दाखल होत आहे.
बरड म्हणजे माळरान, खडकाळ, नापिक जमीन… बागायती जमीन शेतकऱ्यांचे सर्वस्व असते तर नापिक जमीनीचा वापर केवळ गुरे चरवण्यासाठी होतो. तर अशा या बरडीवर सरकारी संस्थेची थोडीशी हालचाल होते आणि एका रात्रीत फासे पलटतात. बरडीला प्रचंड महत्त्व येते. संभाव्य मिळणाऱ्या मुबलक पैशावर मोठमोठी स्वप्ने पाहिली जातात. अचानक मिळणाऱ्या पैशामुळे नाती पणाला लागतात. अचानक आलेली श्रीमंती माणसाला कशी बिघडवते, एक अफवा संपूर्ण गावाला विनाशाच्या उंबरठ्यावर कशी आणून ठेवते. या सगळ्या परिस्थितीचे उत्तम चित्रण म्हणजे ‘बरड’…
अथर्व मुवीज प्रस्तुत, देवेंद्र कापडणीस निर्मित आणि कुमार गांधी सहनिर्मित ‘बरड’चे दिग्दर्शन तानाजी महादेव घाडगे यांनी केले आहे. कमल चौपाल आणि सुरेंद्र सिंग यांनी छायाचित्रन केले आहे.
रोहन – रोहन, संदीप वाडेकर यांनी संगीत दिले असून, पार्श्वसंगीत प्रकाश नर यांचे आहे. डॉक्टर मिथिला कापडणीस यांनी गीत लिहिले आहे. सुहास पळशीकर, भारत गणेशपुरे, शहाजी काळे, राजन पाटील, संजय कुलकर्णी, किशोर चौगुले, धनंजय जामदार असे बरेच दिग्गज कलाकर असलेला हा सिनेमा येत्या १० जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.