प्रवेशप्रक्रिया सुरु; अंतिम तारीख २५ ओक्टोबर
वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म (लघुपट) मोठ्या प्रमाणात तयार केल्या जातात. पण त्या जोपर्यंत जगासमोर येत नाही वा त्यावर पुरस्काराची मोहर उमटत नाही तोवर त्याचा उपयोग नाही. हीच अडचण लक्षात घेऊन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ऐरोली शाखेच्या वतीने नवी मुंबईत शॉर्ट फिल्म फेस्टिवल २०१५ ( कार्निवल ऑफ डिजिटल सिनेमा) आयोजित करण्यात येत असल्याचे अध्यक्ष विजय चौगुले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
सिनेसृष्टीत जाण्यासाठी अनेक नवोदित नानाप्रकारे प्रयत्नशील असतात, परंतु सर्वांनाच झटकन त्यात यश येत नाही. त्यासाठीच शॉर्ट फिल्म मेकिंग हा सुखकर मार्ग आहे. ज्यात कमी खर्चात आपली प्रतिभा जगासमोर मांडण्याची संधी सर्व फिल्ममेकर्सला मिळते. ती शॉर्ट फिल्म (लघुपट) जगासमोर यावी, त्यांचा गौरव व्हावा म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ऐरोली शाखेच्या वतीने शॉर्ट फिल्म फेस्टिवल २०१५ आयोजित करण्यात करण्यात आला आहे.
याबाबत दिग्दर्शक संदीप जंगम यांनी सांगितले की, शॉर्ट फिल्म द्वारे नवोदितांच्या प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतुने आम्ही हा फेस्टिवल आयोजित करत आहोत, ज्यात संपूर्ण भारतातुन मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील शॉर्ट फिल्मला इथे संधी मिळणार आहे. २५ ओक्टोबरपर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरु राहणार असून अधिकाधिक फिल्म मेकर्सनी यात सहभागी व्हावे असे जंगम यांनी सांगितले आहे.
आलेल्या सर्व फिल्म्समधून निवडक १० शॉर्ट फिल्म्स सर्वांनी दाखवण्यात येतील आणि त्यातून ३ सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मला रोख पुरस्कार आणि स्मृतिचिन्ह देण्यात येईल, शिवाय कथा, दिग्दर्शन, संकलन, छायाचित्रण यांसाठीदेखील पुरस्कार आहेत.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे, यासाठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार, लेखक, दिग्दर्शक परीक्षक म्हणून काम पहाणार आहेत, सोबत अखेरच्या दिवशी त्यांचे बहुमोल मार्गदर्शन देखील स्पर्धकांना मिळणार आहे.
संपर्क
इमेल : natyaparishad.airoli@gmail.com
मोबाईल : ७५०६३६०७७८ व ९८२१००९१३७