गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित होणार
धमाकेदार अॅक्शन सिक्वेन्स, कॉमेडी, रोमँटिक आणि फॅमिली ड्रामा असलेला वृंदावन हा सिनेमा येत्या ८ एप्रिलला अर्थात गुढीपाडव्याला सिनेरसिकांच्या भेटीला येतो आहे.

कंम्पलीट एंटरटेनमेंटचं पॅकेज असलेल्या या सिनेमातून राकेश बापट हा चॉकलेट बॉय दमदार पदार्पणास सज्ज झाला आहे. मराठी सिनेमांमध्ये आतापर्यंत कधीही न पाहिलेला असा अॅक्शन सिक्वेन्स या सिनेमात पाहायला मिळणार आहे. राकेश बापट याच्यासोबतच आपल्याला पूजा सावंत आणि वैदेही परशुरामी या दोघीही प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

टी एल व्ही प्रसाद या सुप्रसिद्ध दक्षिणात्य दिग्दर्शकाने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे, त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
हिंदी तसेच साउथ सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारे राजप्रेमी, संदीप शर्मा, सुनील खांद्पुरकर हे तिघे निर्माते असून अमित कारखानीस आणि अनघा कारखानीस हे या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. ‘रिअलस्टिक फिल्म कंपनी’ या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.

जीसिम्सचे कार्तिक निशानदार आणि अर्जुन बर्हान हे सिनेमाचे प्रमोटर्स आहेत. येत्या ८ एप्रिलला म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हा सिनेमा महाराष्ट्रासह सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.