२१ रंगलेखक-शिल्पकारांचे कलाप्रदर्शन सुरु
नागपुरातील २५ ते ७५ वर्ष वयोगटातील २१ रंगलेखक-शिल्पकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन ‘आश्विन छटा’ नावाने मांडले असून, हे आयोजन ट्रान्सेडन्सने केले आहे. चित्रकार चंद्रकांत चन्ने निर्मित हे प्रदर्शन नागपुरातील धंतोली स्थित रामकृष्ण मठाजवळील शॅमेलिऑन कला दालनात १३ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन ८ ऑक्टोबरला सुप्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ हबीब खान यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, ‘ हे सर्व विविध वयाचे, विविध कलामाध्यम हाताळणारे कलाकार एकत्रितपणे बघणे हाच एक आनंदाचा क्षण आहे. नागपुरात अशा कलादालनाची आत्यंतिक गरज होती, टी या निमित्ताने पूर्ण झाली आहे.’

विविध विषयांची मांडणी आणि त्यातील आशय आणि अभिव्यक्ती, अमूर्त आणि वास्तविक शैलीची मांडणी, व्दिमिती आणि त्रिमितीच्या छटा, विविध संकल्पना, स्वप्न, विद्रोह, बालपण, पूर्ण, कृष्णधवल आणि रंग उधळण हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण आहे.