सई ताम्हणकर, प्रिया बापटसह अनेक स्टारकास्ट

दिग्गज कलाकारांची मांदियाळी, उत्कृष्ट दिग्दर्शन, हटके कॅमेरा अँगल्स, सुंदर लोकेशन्स म्हणजे ‘लॅन्डमार्क फिल्मस्’च्या चित्रपटांचे वैशिष्ट्य. ‘सांगतो ऐका’ चित्रपटाच्या निर्मितीनंतर लॅन्डमार्क फिल्मस्चा ‘वजनदार’पणा अधोरेखित होणार आहे.
बिग बजेट सिनेमे बनवणाऱ्या लॅन्डमार्क फिल्मस्च्या विधि कासलीवाल यांचा निर्मितीतला पहिला चित्रपट म्हणजे ‘सांगतो ऐका…!’ या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतले दिग्गज पाहायला मिळाले. मराठी – हिंदी सिनेजगतातले मोठे नाव सचिन पिळगावकर आणि त्या जोडीला विनोदाचे बादशाह भाऊ कदम आणि वैभव मांगले अशी अफलातून कास्ट, सतीश राजवाडेचे दिग्दर्शन. मराठी पदार्पणात असा ‘वजनदार’ सिनेमा देणाऱ्या विधि कासलीवाल यांनी बहुधा सगळेच सिनेमे वजनदार देण्याचा निश्चय केला आहे.
याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, “सिनेमाचे बजेट चांगले असल्याने तो सिनेमा चांगला होत नसतो तर त्या चित्रपटाच्या विषयातून आपण काय देऊ पाहतोय आणि ते कशा पध्दतीने लोकांपर्यंत पोहोचत आहे यावर तो सिनेमा मोठा ठरतो”
लॅन्डमार्क फिल्मस् चा आगामी सिनेमा ही असाच ‘वजनदार’ आहे. नेहमीच अनोखा विषय प्रेक्षकांसमोर मांडणाऱ्या दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.