पत्रकारिता, संस्कृती, क्रीडा, वैदयकीय क्षेत्रातील ‘आदर्श’ गौरव

भारतीय लष्करामध्ये कॅप्टन पदावर कार्यरत असणाऱ्या डोंबिवली कन्या झांखना पासड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
सत्कारमूर्तींमध्ये आपल्या अंधत्वावर मात करुन कॅसिनो, तबल्यामध्ये ‘उस्ताद’ झालेला, राष्ट्रीय स्तरावर जलतरणपटू म्हणून नाव कमाविणारा, २०१४ साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते ‘बेस्ट क्रिएटीव्ह चाईल्ड’ पुरस्काराने गौरविलेला अवघ्या १६ वर्षांचा सिद्धार्थ सावंत, धडाडीच्या महिला पत्रकार म्हणून नावाजलेल्या राजलक्ष्मी पुजारे-जोशी, कला-क्रीडा-संस्कृती क्षेत्रात योगदान देणाऱ्या चतुरंग प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य किरण जोगळेकर, वैद्यकीय माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे डॉ. आनंद हर्डीकर आदी मान्यवरांचा समावेश होता.

“आजकालच्या मुलांना क्रिकेटपटू किंवा सिनेकलाकार रोल मॉडेल्स वाटतात. पण आपल्या आजूबाजूलादेखील आदर्श व्यक्तिमत्वे आहेत हे त्यांना उमजावं यासाठीच स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून एचएसबी एंटरप्रायजेसने डोंबिवलीतील या गुणीजनांचा सत्कार केला. या उपक्रमाचा पुढचा टप्पा म्हणून सर्वसामान्यांना अगरबत्तीचा इतिहास, प्रकार, गुणधर्म, शास्त्रीय दृष्टीकोन ज्ञात व्हावा या हेतूने २३ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट दरम्यान आनंद भवन येथे अगरबत्ती महोत्सवाचे आम्ही आयोजन करीत आहोत. हा महोत्सव विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे, असे एचएसबी एंटरप्रायजेसचे संचालक आशिष वैद्य यांनी सांगितले.

यावेळी ओमकार इंटरनॅशनल स्कूलचे यावेळी ओमकार इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना परुळेकर, ओमकार एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापिका सदस्य दर्शना सामंत, ओमकार इंग्लिश मिडीयम स्कूलचे विजया शेट्टी, अपर्णा वाघ, ओमकार केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या अनुजा नाईक, एचएसबी एंटरप्रायजेसचे संचालक आशिष वैद्य व नारायण वैद्य, साईस कन्सल्टन्सीचे संचालक केदार जोशी, टॅग इव्हेंट्सचे चिन्मय मडके आदी मान्यवर उपस्थित होते.