‘डोण्ट वरी बी हॅप्पी’, ‘कट्यार काळजात घुसली’ ने मारली बाजी
अर्चना नेवरेकर फाउंडेशन प्रस्तुत संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१६ हा चित्र-नाट्य पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. यात ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकाने, तर ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाने बाजी मारली. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संस्कृती कलादर्पणच्या सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
‘या पुरस्कारासाठी माझा विचार केल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ४५ वर्ष अभिनय कारकिर्दीमध्ये रसिकांनी मला अमाप प्रेम दिले. त्याबद्दल प्रेक्षकांचे मी आभार मानतो. या पुरस्कारामुळे मी ओझ्याखाली दबलो गेलो असून, आजही रसिक मायबाप मला पसंत करतात हे मी माझे भाग्य समजतो’ अशी भावना अशोक सराफ यांनी पुरस्कार घेताना व्यक्त केली.
संस्कृती कलादर्पण अध्यक्षा अर्चना नेवरेकर व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा गौरव करण्यात आला. यांसोबतच संस्कृती कलादर्पण सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलावंत मंडळी उपस्थित होती. यंदा नाटक-चित्रपट आणि मालिका अशा तीन वेगवेगळ्या विभागात पुरस्कार देण्यात आले. त्यातील नाटक विभागात डोण्ट वरी बी हॅप्पी, चित्रपट विभागात कट्यार काळजात घुसली आणि मालिका विभागात ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेने सर्वोत्कृष्ट होण्याचा मान मिळवला.
नाटक विभागातील सर्वोत्कृष्ट नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीत अशा तीन पुरस्कारांवर ‘तिन्ही सांज’ या नाटकाने आपले नाव कोरले. ऑल दी बेस्ट २, दोन स्पेशल, परफेक्ट मिस मेच आणि शेवग्याच्या शेंगा या नाटकांनी प्रत्येकी दोन पुरस्कारांवर मोहर उमटवली.
चित्रपट विभागात लोकांच्या पसंतीला उतरलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक, छायांकन, गीतरचना, पार्श्वगायक, संवाद, दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट अशा सर्वाधिक ९ पुरस्कारांवर आपले नाव कोरले. मराठी चित्रपट सृष्टीतले अष्टपैलू अभिनेता सचिन पिळगावकर यांना ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी ‘मानाचा मुजरा’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चित्रपट विभागातील विविध पुरस्कारांसाठी नटसम्राट या चित्रपटाला लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर कोतीला लक्षवेधी पुरस्कार प्राप्त झाला आहे, ‘नटसम्राट’ मधील भूमिकेसाठी विक्रम गोखले यांस विशेष ज्युरी पुरस्कार तर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना अभिनय सम्राट हा पुरस्कार देण्यात आला.
मालिका विभागात तितिक्षा तावडे हिला सर्वोत्कृष्ट पदार्पण तर मृणाल दुसानीसला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तसेच वैभव चिंचाळकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. शिवाय यंदाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये सुप्रसिद्ध मराठी अभिनेता स्वप्नील जोशीला यावर्षीचा फेस ऑफ द इयर तर मानसी नाईकला स्टायल आयकॉन या पुरस्कारांनी नावाजण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्यात १ लाख ६१ हजार रुपयांचा धनादेश अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याकडे ‘नाम फाउंडेशन’ साठी देण्यात आला.
ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, समीक्षक, कथाकार जयंत पवार यांना पत्रकारितेचा पुरस्कार मिळाला असून, ए बी पी माझा या वृत्तवाहिनीला सर्वोत्कृष्ट वृत्तवाहिनीचा पुरस्कार बहाल करण्यात आला. आय.बी. एन. लोकमतचे अमोल परचुरे आणि नीलिमा कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट सूत्रधार पुरस्काराने गौरवण्यात आले.
गेली १६ वर्षे होत असलेल्या सोहळ्याचा थाट यंदाही कायम होता. कलावंतांच्या धमाल परफॉर्मन्समुळे सोहळ्याला चार चाँद लागले. अभिजीत खांडकेकरच्या सूत्रसंचालनात बहार आणण्यासाठी योगेश शिरसाट आणि प्राजक्ता हनमघर यांच्या खुमासदार विनोदांनी महत्वाची कामगिरी केली.
पुरस्कार विजेते
नाटक विभाग
सर्वोत्कृष्ट नेपथ्य
संदेश बेंद्रे – तिन्ही सांज
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना
राजन ताम्हाणे – तिन्ही सांज
सर्वोत्कृष्ट रंगभूषा
विक्रम गायकवाड (इंदिरा)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
राहुल रानडे – परफेक्ट मिसमॅच
सर्वोत्कृष्ट संगीत
परीक्षित भातखंडे – तिन्ही सांज
सर्वोत्कृष्ट लेखक
गजेंद्र अहिरे (शेवग्याच्या शेंगा )
सर्वोत्कृष्ट बालकलाकार
अथर्व बेडेकर (सोबतीने चालताना )
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
ऋतुजा देशमुख – सेल्फी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
अभिजित पवार (ऑल दी बेस्ट-२ )
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता (विभागून)
मयुरेश पेम – ऑल दी बेस्ट-२
समीर चौगुले – श्री बाई समर्थ
विशेष ज्युरी पुरस्कार
अभिनेता – किरण माने – परफेक्ट मिसमॅच
अभिनेत्री – उषा नाडकर्णी – लंडनच्या आजीबाई
लक्षवेधी अभिनेत्री (विभागून)
निर्मिती सावंत – श्री बाई समर्थ
सुप्रिया विनोद – इंदिरा
लक्षवेधी अभिनेता
संजय मोने – शेवग्याच्या शेंगा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
गिरीजा ओंक – दोन स्पेशल
सर्वोत्कृष्ट अभिनेता
उमेश कामत – डोन्ट वरी बी हॅप्पी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
क्षितिज पटवर्धन – दोन स्पेशल
सर्वोत्कृष्ट नाटक
डोन्ट वरी बी हॅप्पी – सोनल प्रॉडक्शन
चित्रपट विभाग
सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक
संतोष फुटाणे – कट्यार काळजात घुसली.
सर्वोत्कृष्ट संकलन
चारुश्री रॉय – डबलसीट
सर्वोत्कृष्ट छायांकन
सुधीर पलसाने – कट्यार काळजात घुसली
सर्वोत्कृष्ट रंगभूषा
महेश बराटे – देऊळबंद
सर्वोत्कृष्ट संगीत (विभागून)
अमितराज सावंत – मितवा
अवधूत गुप्ते – एक तारा
सर्वोत्कृष्ट गीतरचना
सूर निरागस हो – मंगेश कांगणे – कट्यार काळजात घुसली
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका
सावर रे – जान्हवी प्रभू – अरोरा – मितवा
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (विभागून)
सूर निरागस – शंकर महादेवन – कट्यार काळजात घुसली
सुरत पिया की – राहुल देशपांडे-महेश काळे – कट्यार काळजात घुसली
सर्वोत्कृष्ट संवाद (विभागून)
प्रकाश कापडिया – कट्यार काळजात घुसली
किरण यज्ञोपवीत- अभिजित देशपांडे – नटसम्राट
सर्वोत्कृष्ट पटकथा
प्रवीण तरडे – देऊळ बंद
सर्वोत्कृष्ट कथा
स्वप्ना वाघमारे जोशी – मितवा
सर्वोकृष्ट बालकलाकार (विभागून)
अज्ञेश मुंडशिंगकर – कोती
दिव्येश मेदगे – कोती
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (विभागून)
संदीप पाठक – रंगा पतंगा
शशांक शेंडे – ख्वाडा
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
प्रार्थना बेहेरे – मितवा
लक्षवेधी अभिनेता
संजय कुलकर्णी – कोती
प्रथम पदार्पण अभिनय
गश्मीर महाजनी – देऊळबंद
सर्वोत्कृष्ट अभिनेता (विभागून)
सुमित राघवन – संदुक
अंकुश चौधरी – डबलसीट
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
मेधा मांजरेकर – नटसम्राट.
प्रथम पदार्पण दिग्दर्शन (विभागून)
प्रसाद नामजोशी – रंगा पतंगा
भाऊराव कऱ्हाडे- ख्वाडा
लक्षवेधी चित्रपट
कोती – ओम्स आर्ट्स
सामाजिक चित्रपट
देऊळबंद – वटवृक्ष एंटरटेनमेंट प्रा. लि.
लोकप्रिय चित्रपट
नटसम्राट – फिनक्राफ्ट मीडिया आणि गजानन चित्र
फेस ऑफ द ईयर
स्वप्नील जोशी
स्टाईल आयकॉन
मानसी नाईक
विशेष पुरस्कार
अभिनय सम्राट पुरस्कार – नाना पाटेकर- नटसम्राट
विशेष ज्युरी पुरस्कार – विक्रम गोखले- नटसम्राट
मानाचा मुजरा
सचिन पिळगावकर – कट्यार काळजात घुसली
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
सुबोध भावे – कट्यार काळजात घुसली
सर्वोत्कृष्ट चित्रपट
कट्यार काळजात घुसली – श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्मस
मालिका विभाग
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
अश्विनी एकबोटे – दुर्वा – स्टार प्रवाह
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (विभागून)
संग्राम साळवी – सरस्वती- कलर्स मराठी
माधव देवचक्के – सरस्वती – कलर्स मराठी
प्रथम पदार्पण अभिनेत्री
तितिक्षा तावडे – सरस्वती – कलर्स मराठी
सर्वोकृष्ट कथाबाह्य कार्यक्रम – घोषित
कॉमेडीची बुलेट ट्रेन – कलर्स मराठी
सर्वोत्कृष्ट अभिनेता
संतोष जुवेकर – अस्स सासर सुरेख बाई – कलर्स मराठी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
मृणाल दुसानिस – अस्स सासर सुरेख बाई – कलर्स मराठी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (विभागून)
वैभव चिंचाळकर – चीत्रकथी – दूरदर्शन
उमेश नामजोशी – प्रीती परी तुझ वरी- स्टार प्रवाह
लक्षवेधी मालिका विभागून
गणपती बाप्पा मोरया- कलर्स मराठी
अरे वेड्या मना – स्टार प्रवाह
सर्वोत्कृष्ट मालिका
अस्स सासर सुरेख बाई – सेवेन्थ सेन्स मिडिया- कलर्स मराठी
विशेष ज्युरी पुरस्कार
पाषाणपती – दूरदर्शन
वृत्तवाहिनी विभाग
सर्वोत्कृष्ट सूत्रधार पुरुष
अमोल परचुरे – आय. बी. एन. लोकमत
सर्वोत्कृष्ट सूत्रधार स्त्री
नीलिमा कुलकर्णी – आय. बी. एन. लोकमत
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य
ढँण टॅ ढँण – एबीपी माझा
सर्वोत्कृष्ट न्यूज चॅनल
एबीपी माझा
पत्रकारिता पुरस्कार
जयंत पवार (महाराष्ट्र टाईम्स)
पत्रकारिता पुरस्कार
सर्वोत्कृष्ट पी. आर .
अमृता माने (औदुंबर एंन्टरटेनमेंन्टस)