‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय..’ची उत्सुकता वाढली
सुशीलकुमार शिंदे लिखित ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय..’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन रविवार, दिनांक २ ऑक्टोबर २०१६ या रोजी पुणे येथे होणार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली, मलिका अमर शेख यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता हा लोकार्पण सोहळा होणार आहे.
हा काव्यसंग्रह ‘ग्रंथाली’च्या वतीने प्रकाशित होत असून, काव्यसंग्रहाची शब्दप्रेमींना उत्सुकता आहे.