४ नोव्हेंबरपासून सुरु होतेय प्राथमिक फेरी!
हौशी नाट्यकर्मींचा हक्काचा रंगमंच म्हणून ओळख असलेल्या ‘उंबरठा एकांकिका स्पर्धा २०१६’च्या प्राथमिक फेरीला ४ नोव्हेम्बरपासून सुरुवाट होत असून, या स्पर्धेतून एकूण ४५ एकांकिका उत्कर्ष सेवा मंडळाचा ‘उंबरठा ओलांडणार आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील रंगसेवक सहभागी होणार असून ही स्पर्धा सेकंडरी हायस्कुल, ना.म. जोशी मार्ग, डिलाईल रोड, मुंबई येथे होणार आहे.
या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून दीपोत्सवानंतरच्या या रंगोत्सवात नाट्यकर्मींसाह रसिकांनीही सहभागी व्हावे असे आवाहन उत्कर्ष सेवा मंडळाचे अध्यक्ष शामराव चौगुले, कलाविभाग प्रमुख तुषार होडगे, चिटणीस कृष्णा कदम यांनी केले आहे.
ज्येष्ठ संगीतकार स्व. श्रीकांतजी ठाकरे यांच्या स्मरणार्थ गेल्या १४ वर्षांपासून उत्कर्ष सेवा मंडळ ही राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा घेत आहे.
उंबरठा २०१६ प्राथमिक फेरीच परीक्षण सिने- नाट्य अभिनेत्री विमल म्हात्रे, सिने-नाट्य दिग्दर्शक व अभिनेता सुदेश म्हशीलकर व ‘रात्रीस खेळ चाले’ फेम व नाट्यलेखक प्रल्हाद कुडतरकर हे करणार आहेत.