महाराष्ट्राचा सुपरस्टार आणि स्टाईल आयकॉन अंकुश चौधरींचा नवा लूक सोशल मीडियावर प्रचंड लाईक कमावतो आहे. हा लूक त्याच्या नव्या चित्रपटातील व्यक्तिरेखेशी संबंधित असल्याचे बोलले जात असले तरी त्या चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे.
अंकुशचा न्यू लूक सोशल मीडियावर सुपर हीट!
अंकुशची स्टाईल म्हणजे सर्वांना क्लीन बोल्ड करणारी आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील या फिट अँड फाईन अभिनेत्याचे नुकतेच सोशल मीडियावर त्याच्या न्यू हेअर स्टाईलमधले फोटोज शेअर केले गेले आहेत.
असं म्हटलं जात आहे की अंकुश हा सुपरकूल लूक त्याच्या एका आगामी सिनेमासाठी केला गेला आहे. सिनेमाचं नाव अजूनही गुलदस्त्यात आहे पण अंकुशचा हा हटके लूक मात्र सोशल मीडियावर सर्वांना भुरळ पाडण्यात यशस्वी ठरतोय, त्यामुळे सिनेमा कुठलाही असो पण स्टाईल आयकॉनच्या लूकला सर्वांनी सोशल मीडियावर लाईकची भरपूर कमाई केली आहे.