कासव, लेथ जोशी या मराठी चित्रपटांचा समावेश
प्रभात चित्र मंडळ आणि ठाणे आर्ट गिल्ड या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सिनेमॅटीक सिनेव्हिजन यांच्या सहकार्याने चित्रभारती या भारतीय चित्रपट महोत्सव १५ मे ते १९ मे २०१७ दरम्यान माटुंगा येथील प्रि.एल्. एन्. वेलिंगकर इस्टिट्यूटच्या सभागृहामध्ये करण्यात आले आहे.
यावर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झालेल्या भारतीय चित्रपट, लघुपट व माहितीपटांचे प्रदर्शन चित्रभारतीमध्ये करण्यात येणार आहे.
चित्रभारतीचे महोत्सवाचा शुभारंभ सुवर्णकमळ विजेता चित्रपट कासव (दिग्द. सुमित्रा भावे, सुनिल सुकथनकर) आणि आबा, ऐकताय ना ? (दिग्द.आदित्य जांभळे) या लघुपटाच्या प्रदर्शनाने होणार आहे.
पाच दिवसांच्या या महोत्सवात लेथ जोशी (दिग्द. मंगेश जोशी), एक अलबेला (दिग्द. शेखर सरतांडेल), मुक्तिभवन, हंदूक (आसामी), व्हेन द वूड ब्लूम (मल्याळम), के सेरा सेरा (कोंकणी) हे चित्रपट त्याच बरोबर फायरफ्याईज इन द अँबिस व परिसस्पर्श (प्रभाकर पेंढारकर जीवन कर्तृत्व ) हे माहितीपट दाखवण्यात येणार आहेत.
चित्रभारती आयोजित लघुपट स्पर्धेतील निवडक लघुपटदेखील महोत्सवात पहायला मिळणार आहेत. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. प्रि.एल्. एन्. वेलिंगकर इस्टिट्यूट आणि सिनेमॅटिक व्हिजन हे या चित्रपट महोत्सवाचे सह-आयोजक आहेत. महोत्सवात उपस्थित राहू इच्छिण-या प्रेक्षकांनी प्रभात चित्र मंडळाच्या कार्यालयात प्रतिनिधी नोंदणी करावी.
संपर्क :
प्रभात कार्यालय – शारदा सिनेमा बिव्डिंग, पहिला मजला, नायगाव, दादर (प), मुंबई.
दूरध्वनी : ०२२-२४१३ १९ १८