‘एफयू’ची टीम ‘कलर्स मराठी’वर
पहिल्याच सिनेमात रसिकांना झिंगाटवर ताल धरायला लावणारा परश्या अर्थात आकाश ठोसर कलर्स मराठीवरील ढोलकीच्या तालावर नाचला. त्याचा नवीन चित्रपट ‘एफयू फ्रेंडशिप अनलिमिटेड’च्या प्रमोशनसाठी टीमसोबत त्याने लावणीचा ठेका धरला. त्याच्यासोबत सत्या मांजरेकर, वैदेही परशुरामी, मयुरेश पेम, संस्कृती बालगुडे आणि शुभम ‘ढोलकीच्या तालावर’च्या सेटवर आले. हा विशेष भाग प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे २९ आणि ३० मे रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
‘ढोलकीच्या तालावर’ कार्यक्रमातील स्पर्धकांना एक सरप्राईज मिळाले आहे. पहिल्याच चित्रपटात संपूर्ण महाराष्ट्राला स्वत:च्या प्रेमात पडणारा ढोलकीच्या तालावरच्या मंचार आला आणि सगळ्यांची मने जिंकली.
या भागामध्ये छोट्या आणि मोठ्या अप्सरांनी एक से बडकर एक नृत्य सादर केली. समृद्धी आणि धनिष्ठाने ‘वाजले की बारा’ या गाण्यावर लावणी सादर केली, त्यांनी या लावणीचे सादरीकरण कॉमिकप्रकारे केले, त्यामुळे सगळ्यांच आश्चर्य वाटले. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन फुलवानेच केले असल्यामुळे तिने या सादरीकरणाला विशेष पसंती दर्शवली.
धनश्री आणि अनुष्काने क्रंप डान्स स्टाईलचा वापर करून लई कसाची या गाण्यावर लावणी सादर केली. या लोकप्रिय लावण्या स्पर्धकांनी वेगळ्याच प्रकारे सादर केल्यामुळे त्यांनी परीक्षक तसेच या भागानिमित्त आलेले विशेष पाहुणे या सगळ्यांचीच मने जिंकली.
लहान समृद्धीने ‘उगवली शुक्राची चांदणी’ या गाण्यावर नृत्य सादर केले. तिची लावणी आकाश ठोसरला इतकी आवडली की त्याने तिला घरी घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली. आकाश ठोसरने अनेक गंमती जंमती, आठवणी यावेळेस प्रेक्षकांना सांगितल्या. आकाश म्हणाला, ‘मी पेहलवान असताना लावण्या चोरून बघायचो”.
कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढली जेंव्हा आकाशसोबत शकुताईंनी, छोट्या अप्सरांनी एकत्र येऊन ‘झिंगाट’ गाण्यावर अफलातून नृत्य सादर केले. मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्या पुरुषांनी म्हणजेच सत्या, शुभम, मयुरेश, जितेंद्र, हेमंत आणि आकाशने सगळ्या लहान मुलींना पाठीवर घेऊन जोरबैठका मारल्या, ज्यामध्ये आकाश ठोसर विजेता ठरला.
येत्या आठवड्यात ढोलकीच्या तालावर कार्यक्रमामध्ये मानाचा फेटा मीनाक्षी आणि पलक यांनी पटकवला आहे. या जोडीचा फ्लश मॉब पाहण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना २९ मे रोजी मिळणार आहे.