भगवानदादांच्या भूमिकेचा सन्मान
गेल्या वर्षी कित्येक सिनेमांनी मराठी सिनेसृष्टी समृद्ध झाली. भारताच्या पहिल्या डान्सिंग आणि ऍक्शन हिरो भगवान दादा यांचा जीवनपट उलगडणारा ‘एक अलबेला’ हा त्यापैकीच एक… या चित्रपटात मंगेश देसाई यांनी भगवानदादांच्या रूपात येऊन प्रेक्षकांबरोबरचं समीक्षकांचीही मनं जिंकली आणि या भूमिकेसाठी मंगेश देसाई यांना यंदाच्या फिल्मफेअर ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.

या पुरस्कारापूर्वी या सिनेमासाठी मंगेश देसाई यांना स्रिकींन पुरस्कार, स्टेट पुरस्कारसुद्धा मिळालेे आहेत.
नृत्याच्या अनोख्या शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भगवानदादांनी ब्लॅक अॅण्ड व्हाईटचा काळ गाजवला. या नटाच्या भूमिकेसाठी मंगेश देसाई यांनी त्यांचे जुने चित्रपट पाहून त्यांची शैली आत्मसात करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. या भूमिकेला मिळालेला पुरस्कार हा भगवान दादांनाच मिळालेला पुरस्कार आहे, अशी भावना मंगेश देसाई यांनी व्यक्त केली.