‘स्टार प्रवाह’चा ‘आता थांबायचं नाय’ हा विचार ‘नकुशी’फेम प्रसिद्धी किशोरनं आत्मसात केला आहे. स्वत:च्या कमाईतून कार घेण्याचं स्वप्न तिनं नुकतंच साकार केलं आहे.

नव्याकोऱ्या कारविषयी प्रसिद्धी म्हणाली, ‘शूटिंगच्या अनियमित वेळा आणि स्वत:च्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं मी कार घेण्याचा विचार केला. कार घेणं हे माझं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण झाल्यानं मी प्रचंड आनंदात आहे. कार घेणं ही जबाबदारी असल्यानं थोडी भीती वाटत होती. मात्र, आता घेतली नाही, तर कधीच घेता येणार नाही म्हणून आता थांबायचं नाय म्हणत कार घेतली. स्वकष्टातून हे स्वप्न पूर्ण केल्याचा अभिमानही वाटतो. माझ्या स्वतंत्र होण्यात ‘नकुशी’चा मोठा वाटा आहे. मी कार घेतल्याचा माझ्या इतकाच आनंद माझ्या घरच्यांच्या डोळ्यातही आहे. माझे आई-वडील, बहीण, बाकी साऱ्यांच्याच पाठिंब्यानं माझी इथवरची वाटचाल झाली.’