हिंदीचा छोटा पडदा गाजवणारी नीता शेट्टीचे मराठीत पदार्पण
स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे या मराठी सिनेइंडस्ट्रीच्या ‘एस’ फॅक्टर्सना एकत्र आणणाऱ्या ‘फुगे’ या आगामी सिनेमातून नीता शेट्टी ही ग्लॅमरस अभिनेत्री प्रेक्षकांसमोर येणार आहे. हिंदीचा छोटा पडदा गाजवणारी ही बोल्ड अभिनेत्री ‘फुगे’ या सिनेमाच्या माध्यमातून प्रथमच मराठीत पदार्पण करत आहे. यात ती आपल्याला एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळणार असून, सुबोध भावेच्या प्रेयसीच्या भूमिकेत ती झळकणार आहे.


इंदर राज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांची निर्मिती असलेला हा सिनेमा येत्या १० फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.