१३ डिसेंबरपर्यंत सुरु रहाणार चित्रप्रदर्शन

खिलचंद नारायण चौधरी यांच्या चित्रात निसर्ग व त्याच्या विविध चमत्कृतींमधील विरोधाभास तसेच मूलभूत सौंदर्य, अनेकविध ऐतिहासिक वास्तूंमधील रचनात्मक वैशिष्ट्ये हयांचे ठळक दर्शन घडते. तसेच अनेक ऋतूंमधील निसर्गाची विविध रुपे व त्यातील सौन्दर्य आणि परस्पर विरोधी अशा चमत्कृती ह्यांचे दर्शन आपल्या कलात्मक व वैशिष्ट्यपूर्ण शैलीत घडवताना त्यांनी विक्टोरिया टर्मिनस स्टेशन, फ्लोरा फाऊंटेन, बनारस वगैरे एतिहासिक वास्तूंचे रचनात्मक दृष्टया सविस्तर विवरण आपल्या चित्रामधून रसिकांपुढे सादर केले आहे. त्यांचा हा चित्राविष्कार सर्व रसिकांना आवडेल असाच आहे.