रमेश उदारे यांचे नवे पुस्तक
पत्रकार रमेश उदारे यांचे ‘फिल्मी चक्कर’ हे पुस्तक रविवार दि. १० जुलै, २०१६ रोजी प्रकाशित होणार आहे. अनघा प्रकाशनातर्फे डोंबिवली पूर्व येथील के. डी. एम. सी. आचार्य अत्रे वाचनालयाच्या मोरया सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
या पुस्तकामध्ये लता मंगेशकर, देव आनंद, दादा कोंडके, राज कपूर, सुधीर फडके, राजा गोसावी, आशा काळे यांच्यासंबंधी आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. बुजुर्ग नाटककार अशोक समेळ यांच्या हस्ते ‘फिल्मी चक्कर’चे प्रकाशन होणार असून याप्रसंगी लेखक प्रा. कृष्णकुमार गावंड, प्रकाश चांदे यांच्यासहित साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली काळे करणार असून हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला आहे.