ठाणे येथील प्रसिद्ध रंगलेखक विठ्ठल भिंगारे याचे ‘अक्ष’ हे चित्रप्रदर्शन मुंबईतील जहांगीर कलादालनात ७ एप्रिलपासून सुरु झाले असून ते १३ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे.
कपडे अडकवण्याची आकडी आणि कॉलरमुळे मानवी जीवनात येणारा ताठपणा, स्वाभिमान, व्यवस्थितपणा व सौदर्य या भोवती चित्रातील सा-या प्रतिमा गुंतवून ठेवणा-या आहेत. उभ्या-आडव्या रेषांचे अडथळे पार करून निसर्गाचा आस्वाद या कलाकृतींत दाखवण्यात आला आहे.