रत्नागिरीच्या श्रीरंग नाट्यसंस्थेचे आयोजन
रत्नागिरीच्या नाट्यसंस्थेने प्र.ल.मयेकर स्मृती नाट्यलेखन स्पर्धेचे आयोजन केले असून, सलग ११ वर्षापासून होणा-या या स्पर्धेत लेखकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेविषयी…
*अप्रकाशित..नवीन मराठी गद्य संहिताच स्वीकारल्या जातील.
*दीर्घांक किंवा २ अंकी संहिता अपेक्षित आहे.
*प्रवेश शुल्क २०० रुपये म.ऑर्डर/डी.डी..अथवा रोख पाठवावे. डी.डी…”श्रीरंग,रत्नागिरी” या नावे काढावा.
म.ऑ. खालील पत्त्यावर पाठवावी.
*सुवाच्य संहितेच्या ३ प्रती खालील पत्त्यावर पाठवाव्यात.
*संहिता आधारीत..रूपांतरीत असल्यास तसा स्पष्ट उल्लेख करावा.
*संहिता पाठविण्याची अंतिम तारिख ३१ जुलै २०१६.
*निकाल ऑक्टोबर २०१६ मधे जाहीर होईल.
*पारितोषिक वितरण समारंभास अनुपस्थित राहिल्यास रोख पारितोषिक दिले जाणार नाही.
*परिक्षकांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक राहील त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
*अपरिहार्यतेनुसार नियमावलीत बदल करण्याचे अधिकार संस्था राखून ठेवित आहे.
*लेखकाच्या परवानगीशिवाय कोणतीही संहिता इतरत्र हस्तांतरीत केली जाणार नाही.
*पारितोषिके.
प्रथम – रू.७५००, द्वितीय – रू.५००० आणि तृतिय – रू.३०००.
*परिक्षकानी शिफारस केल्यास उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाईल.
*संपर्क..
भाग्येश खरे..9423291446
गोपाळ जोशी..9421143996
प्रतिभा केळकर..9421143193
*संहिता/म.ऑ. पाठविण्यासाठी पत्ता…..
गोपाळ गजानन जोशी.
ओम्कार मेडिकल स्टोर्स,
गोडावून स्टॉप,मु.पो.नाचणे,
ता.जि.रत्नागिरी.415639.[2