१० ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता रंगचिंतनावर नाट्याविष्कार
सुप्रसिद्ध रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित ‘अनहद नाद – अनहर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स’ या रंगचिंतनावर नाट्याविष्काराचा प्रयोग शनिवारी १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी नाट्य मंदिर (दादर) मुंबई इथे आयोजित आहे. या नाटकाची निर्मिती एक्सपेरिमेंटल थिएटर फाउंडेशनने केली आहे.
https://www.youtube.com/watch?v=SWJGA4behHc
“अनहद नाद – अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स’ हे नाटक एक कलात्मक चिंतन असून, कला आणि कलाकारांच्या कलात्मक गरजा, कलेच्या मूलभूत प्रक्रिया अंतर्बाह्य समजून त्या विश्लेषित करण्याची प्रक्रिया आहे. कारण कला ही व्यापार नाही तसेच कलाकार हा व्यापारी नाही आणि आयुष्य हे नफा-तोटयांचा हिशेबही नाही. म्हणूनच हे नाटक कलेला आणि कलाकारांना कलेच्या व्यापारिकरणांतून उन्मुक्त करते, त्यांना सकारात्मक, सृजनात्मक आणि कलात्मक उर्जेने उजळून, बहरुन, सुंदर विश्वाची रचना करण्याकरीता प्रेरीत आणि प्रतिबद्ध करते.
अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, तुषार म्हस्के, कोमल खामकर आणि अनघा देशपांडे हे कलावंत या नाटकात आपला अभिनय साकार करतील. एक्सपेरिमेंटल थिएटर फाउंडेशन २३ वर्षांपासून देश-विदेशांत आपल्या सार्थक, प्रतिबद्ध प्रयोगशीलतेसाठी प्रसिद्ध आहे.