२ ते १२ मेदरम्यान अंतिम फेरी
यावर्षी घेण्यात आलेल्या महाराष्ट्रराज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल सांस्कृतिक कार्यसंचालनालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केला आहे. या स्पर्धेत एकूण ३७ नाट्यसंस्थांनी प्रयोग सादर केले. त्यामध्ये अंतिम फेरीसाठी खालीलप्रमाणे दहा नाटकांची निवड करण्यात आलेली आहे.
सेल्फी (असीम एन्टरटेनमेंट), वाडा चिरेबंदी (जिगीषाआणि अष्टविनायक), दोन स्पेशल (अथर्व थिएटर), अ फेअरडिल (श्री सिध्दीविनायक), हा शेखर खोसला कोण आहे (भद्रकाली प्रॉडक्शन), शेवग्याच्या शेंगा (श्री चिंतामणी), डोण्टवरी बी हॅप्पी (सोनल प्रॉडक्शन), परफेक्ट मिसमॅच (सोनलप्रॉडक्शन), श्री बाई समर्थ (अष्टविनायक), सर्कीट हाऊस(प्रवेश व भूमिका थिएटर्स).
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रविंद्र बेर्डे, विजय तापस आणि प्रमोद पवार यांनी काम पाहिले. या स्पर्धेची अंतिम फेरी प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरीवली येथे दि. २ मे ते १२ मे २०१६ या कालावधीत होईल.