योगिनी चौक यांचे रंगचिंतन
अभिनेत्री म्हणून जगण्याची जिद्द!
आणि समर्पण म्हणजे साधनाशक्ती!
‘थिएटर ऑफ रेलवन्स” या तत्वज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये आल्यावर ‘सात्विकता’ मिळाली.
विचारांची दृष्टी मिळाली.
परावलंबित्व खोडलं आणि स्वावलंबन अंगिकारलं
माझ्या ‘कला साधने’विषयी लेखन आणि शेअरिंग केलं अनेक माध्यमातून…
अनेकांनी नाकारलं, नाकं मुरडली,
काहींनी समजावलं, बाई नको त्या दिशेला नको जाऊ…
मग माझाही, कधी संवाद चाचपडला तर कधी विश्वास डगमगला
अनेकदा मी विखुरले, नकारात्मकतेच्या विळख्यात अडकले
पण ‘अनहद नाद’चे सतत प्रयोग आणि कलात्मक नाट्य महोत्सवांनी उर्जा दिली आणि पटलं,
हेच सत्य, हेच जीवन!
हे चिंतन आहे. ही सर्वव्यापकता आहे.
प्रवाहाविरुद्ध आहे म्हणूनच मी एकटी आहे.
पुन्हा प्रवास सुरु झाला, पुन्हा शेअरिंग सुरू झालं.
कला उद्योजकतेवर विश्वास मिळाला, फलस्वरूप!
स्वतःवर विश्वास निर्माण झाला, फलस्वरूप!
नकारात्मक उर्जेला ओळखू लागले,
‘हाय-हाय’ ला टाळू लागले…
स्वतःसाठी तर सगळेच जगतात मी कलेसाठी, “कलात्मकतेसाठी” जगणार हे निश्चित झाले.
अब संतुलित रूप से आगे बढना हैं।
“कलात्मक दृष्टी” को आगे बढाना हैं।
हम हैं।
प्रेरणा : मंजुल भारद्वाज