नवरात्रोत्सवातही सुगंध दरवळणार
गणेश चतुर्दशीचे औचित्य साधून म्हैसूरदीप पर्फ्युमरी हाउसने आपली ‘झेड ब्लॅक मेगा अगरबत्ती’ मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर आणि फोर्टचा इच्छापूर्ती गणपती येथे पहिल्यांदा प्रज्वलित केली. त्याचबरोबर ५००० अगरबत्ती भेट म्हणून गणेश भक्तांना देण्यात आले.

गणेशोत्सवप्रमाणेच नवरात्रीउत्सवसुद्धा फार थाटामाटात साजरा केला जातो. नवरात्रीच्या ९ दिवसात प्रत्येक भक्त आपल्या देवीपूजेसाठी काहीना काही वेगळे करत असते. या वर्षीच्या दुर्गापूजाचे वातावरण सुगंधीत व प्रसन्न राहील कारण “झेड ब्लॅक मेगा अगरबत्ती” विविध मंडळात पाहायला मिळणार आहे.
‘आम्ही झेड ब्लॅकच्या ‘प्रार्थना होगी स्वीकार’ या टॅगलाइनवर दृढ विश्वास ठेवतो कारण जेव्हा एखादी गोष्ट सर्वोत्तमपणे करण्याचा विचार केला जातो, तेव्हा आपल्याला सगळ्या प्रार्थनांचे उत्तर मिळते. गणेशोत्सवप्रमाणेच नवरात्रीतसुद्धा या मेगा अगरबत्त्या दुर्गापूजेसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या अश्या मोठ्या उत्सवाचा एक छोटासा भाग झाल्या बद्दल मी खूप आभारी आणि आनंदी आहे.” असे एम डी पी एचचे संचालक अंकित अगरवाल यांनी सांगितले.
म्हैसूरदीप पर्फ्युमरी हाउस ही अगरबत्ती निर्मिती करणारी भारतातील २५ वर्षे जुनी कंपनी आहे. या कंपनीत जवळपास १०० प्रकारचे सुगंध हे ४०० प्रकारचे विविध घटक वापरून तयार केले जातात. इंदूर येथे असलेल्या त्यांच्या कंपनीत अगरबत्ती उत्पादन करण्यासाठी तब्बल ७०% महिला वर्ग कार्यरत आहेत. “झेड ब्लॅक” म्हैसूरदीप पर्फ्युमरी हाउस यांचा प्रसिद्ध ब्रँड असून सुप्रसिद्ध क्रिकेटर महिन्द्र सिंग धोनी ब्रँड एंबेसेडर आहे.