मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा १ मेपासून
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित २९व्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेची अंतिमफेरी पनवेलमध्ये होणार असून, त्यात पानवेलकरांना ‘टॉप१०’ नाटकांचा महोत्सव पाहण्याची संधी मिळणार आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर केला आहे. या स्पर्धेत एकूण २४ नाट्यसंस्थांनी प्रयोग सादर केले. त्यामध्ये अंतिम फेरीसाठी दहा नाटकांची निवड करण्यात आलेली आहे.
व्यावसायिक रंगभूमीवरील अमर फोटो स्टुडीओ (सुबक), एक शुन्य तीन (रुजुता प्रॉडक्शन्स), कोडमंत्र (अनामिका रसिका प्रॉडक्शन), मग्न तळयाकाठी (जिगिषा आणि अष्टविनायक), किमयागार (स्वरानंद आणि व्ही. आर. प्रॉडक्शन्स), के दिल अभी भरा नही (वेद प्रॉडक्शन्स), ती फुलराणी (अष्टगंध), साखर खाल्लेला माणूस (एकदंत क्रिएशन्स), बंध-मुक्त (जगदंब क्रिएशन्स), यु टर्न-२ (जिव्हाळा) या दहा नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आलेली आहे.
प्राथमिक फेरीचे परीक्षक म्हणून विजय टाकळे, श्रीनिवास नार्वेकर आणि प्रसाद ठोसर यांनी काम पाहिले. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या सर्व नाट्यसंस्थांचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.
या स्पर्धेची अंतिम फेरी दि. १ मे ते ६ मे २०१७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.